नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही स्टेट बँक (एसबीआय) मध्ये जनधन खाते उघडले असेल तर ही तुमच्यासाठी खुप फायद्याची बातमी आहे. बँक आपल्या जनधन खातेधारकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा फायदा देत आहे. बँकेने ट्विट करून ग्राहकांना माहिती दिली आहे. बँक जनधन खातेधारकांना रुपे कार्डच्या मदतीने खात्यातून पैसे काढण्याची सुविधा देते आणि तुम्ही खरेदी सुद्धा करू शकता.
जनधन खात्याचे फायदे –
* 6 महिन्यानंतर ओव्हरड्राफ्ट सुविधा
* 2 लाख रुपयांपर्यंत अॅक्सीडेंटल इन्श्युरन्स कव्हर
* 30,000 रुपयांपर्यंतचे लाईफ कव्हर, जे लाभार्थीच्या मृत्यनंतर मिळेते
* डिपॉझिटवर व्याज मिळते
* खात्यासोबत फ्री मोबाइल बँकिंगची सुविधा दिली जाते
* जनधन खाते उघडणार्यास रुपे डेबिट कार्ड दिले जाते, ज्यातून खात्यातून पैसे काढू शकता किंवा खरेदी करू शकता
* जनधन खात्याद्वारे वीमा, पेन्शन प्रॉडक्ट्स खरेदी करणे सोपे
* जनधन खाते असेल तर पीएम किसान आणि श्रमयोगी मानधन सारख्या योजनांमध्ये पेन्शनसाठी खाते उघडले जाईल
* देशभरात पैसे ट्रान्सफरची सुविधा
* सरकारी योजनांचे पैसे थेट खात्यात येतील
असे उघडा खाते
जवळच्या बँकेत जाऊन हे खाते उघडू शकता. यासाठी बँकेत एक फॉर्म भरावा लागेल. त्यामध्ये सर्व माहिती भरावी लागेल. यासाठी आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, वोटर कार्ड, नरेगा जॉब कार्ड, अथॉरिटीचे लेटर, गझेटेड अधिकार्याचे लेटर ही कागदपत्रे लागतील.