नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणा-या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) 44 कोटी ग्राहकांसाठी(SBI latest news for customers) मोठी बातमी आहे. 1 जुलैपासून बँकेच्या एटीएममधून (ATM ) पैसे काढण्यापासून ते चेकबुकपर्यंत काही नियमांत मोठे बदल होणार आहेत. याकरिता 1 जुलैपासून ग्राहकां (customer) ना काही अधिकचे शुल्क द्यावे लागणार आहे. बदलणारे नियम बेसिक सेव्हिंग अकाउंट डिपॉझिट (BSBD) अकाउंट होल्डर्ससाठी लागू होणार आहेत. एसबीआयने ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.
state bank of india news in 2 days these rules will change for sbi customers they will be charged for withdrawing money from atm
बँकेने गरीब घटकांना कोणत्याही शुल्काशिवाय खाती उघडण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एसबीआय बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट ( BSBD) अकाउंट योजना सुरु केली आहे. यात कमीतकमी किंवा जास्तीत जास्त बॅलन्सची आवश्यकता नसते. या खातेदारांना एटीएम-कम-डेबिट कार्ड मिळते. केवायसीची (Know Your Customer KYC) वैध कागदपत्रे असलेली कोणतीही व्यक्ती एसबीआयकडे बीएसबीडी खाते उघडू शकते. बीएसबीडी खातेधारकांना दरमहा 4 वेळा मोफत पैसे काढता येतात, ज्यात एटीएम आणि बँक शाखांचा समावेश आहे. मोफत मर्यादेनंतर बँक प्रत्येक व्यवहारावर 15 रुपये अधिक जीएसटी घेईल. होम ब्रँच, एटीएम आणि गैर एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यावर शुल्क लागू होईल.
चेकबुक शुल्क (Checkbook)
BSBD खातेधारकांना एका आर्थिक वर्षात 10 चेकची कॉपी मिळते. आता 10 चेकच्या चेकबुकवर चार्जेस द्यावे लागतील. 10 चेकच्या पानांसाठी बँक 40 रुपये आणि जीएसटी शुल्क आकारते. तसेच 25 चेक लीवसाठी बँक 75 रुपये आणि जीएसटी चार्ज करेल. तर इमर्जन्सी चेकबुकवर 10 पानांसाठी 50 रुपये अधिक जीएसटी द्यावा लागणार आहे. तर ज्येष्ठांना चेकबुकवर नवीन सेवा शुल्कातून सूट दिली आहे.
SBI ATM मधून पैसे काढण्याचे नियम
SBI ATM किंवा बँकेतून पैसे काढणे 4 वेळा मोफत आहे.
यानंतर पैसे काढण्यासाठी 15 रुपये आणि जीएसटी शुल्क लागू केले आहे.
एसबीआयने अलीकडेच धनादेश वापरुन रोख पैसे काढण्याची मर्यादा वाढवून दररोज एक लाख रुपये केली आहे.
web title: SBI customers latest news | Important news for SBI customers! There will be a big change in the rules from July 1, you will have to pay extra fees, know.
Supreme Court | 31 जुलैपर्यंत वन नेशन, वन रेशनकार्ड योजना लागू करा; SC चे राज्यांना आदेश
Khadki Police | मध्यरात्री खडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तरूणाच्या खुनाचा प्रयत्न