नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमच्याकडे भारतीय स्टेट बँकेचे सेविंग अकाउंट असेल तर, लवकरात लवकर खात्याला आधार लिंक करा. एसबीआयच्या म्हणण्यानुसार, आधार बँक खात्याशी जोडणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला सरकारी खात्यांचा लाभ घ्यायचा असेल तर बँक खाते आधारशी जोडणे आवश्यक आहे. जर तुमचे खाते आधारशी लिंक असेल तरच तुमची पेंशन आणि एपीजी या सरकारी योजनेतील पैसे तुमच्या खात्यात जमा होतील.
SBI काय म्हणाले… जाणून घ्या
SBI ने ट्विटरद्वारे ग्राहकांना डायरेक्ट लाभ व्हावा, यासाठी बँक खाते आधार कार्डशी लिंक करण्यासाठी सांगितले आहे. SBI ने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले, आम्ही आमच्या ग्राहकांना कळवत आहोत की, भारत सरकारकडून प्रत्यक्ष लाभ किंवा अनुदान प्राप्त करण्यासाठी आधार कार्ड सिडींग अनिवार्य आहे. घर बसल्या तुम्ही आधार लिंक करू शकता. यासाठी बँकेच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. त्यासाठी जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस-
SBI एटीएम ने करा रजिस्टर
* SBI एटीएमवर जा.
* डेबिट कार्ड स्वाईप करा.
* पिन कोड टाका.
* मेनू सिलेक्ट करा.
* आता ‘ Service-Registration’ पर्याय निवडा.
* त्यानंतर ‘Aadhaar Registration’ अथवा ‘Inquiry’ निवडा.
* आता बँक अकाउंटमध्ये जाऊन ‘saving’ निवडा.
* तुमचा आधार नंबर टाका. तुम्हाला पुन्हा आधार नंबर टाकण्यासाठी सांगितले जाईल.
* सिडींगच्या स्थितीसाठी तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक sms येईल.
SBI Anywhere App द्वारे रजिस्टर करा
* सर्वात आधी SBI Anywhere App उघडा.
* येथे ‘Requests’ ऑप्शनवर जाऊन ‘Aadhaar’ सिलेक्ट करा.
* ‘Aadhaar Linking’ वर क्लिक करा आणि सूचीमधून CIF सिलेक्ट करा.
* तुमचा आधार नंबर टाका आणि पुन्हा सबमिटवर क्लिक करा.
* तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर लिंक करण्याचे स्टेट्स तपासा.
SBI Net Banking द्वारे रजिस्टर करा
* सर्वात आधी www.onlinesbi.com वर लॉग इन करा.
* ‘My Accounts’ वर क्लिक करून ‘Link your Aadhaar number’ निवडा.
* आता तुमचा आधार नंबर टाका आणि ‘Submit’ बटनावर क्लिक करा.
* पुढच्या पेजवर खाते नंबर निवडा, आधार नंबर टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा.
* प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरचे शेवटचे २ अंक तुम्हाला दिसतील.
* तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मॅपिंगची स्थिती दिली जाईल.
SBI शाखेत जाऊ शकता
* तुमच्या जवळ असलेल्या SBI शाखेत जावा.
* तुमचा आधार नंबर किंवा ई-आधारची एक कॉपी सोबत घ्या.
* विनंती अर्ज भरा.
* आधारची झेरॉक्स कॉपीसोबत सबमिट करा.
* आवश्य पडताळणी केल्यानंतर शाखेद्वारे लिंक केले जाईल.
* सिडींग स्थितीच्या संधर्भात तुमच्या निंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक SMS येईल.
अकाउंट आधारशी लिंक आहे की नाही, चेक करा –
* www.uidai.gov.in वर जा.
* ‘आधार’ मध्ये ‘आधार/बँक खाते लिंक स्थिती’ वर क्लिक करा.
* तुमचा १२ अंकी आधार क्रमांक किंवा ६ अंकी वर्च्युअल आयडी प्रविष्ट करा.
* सुरक्षा कार्ड प्रविष्ट करा आणि ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करा.
* तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल.
* ओटीपी प्रविष्ट करा आणि ‘लॉगिन’ करा.