पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ओबीसी, एस्सी, एसटी हक्क बचाव समितीच्या वतीने १३ पॉईंट रोस्टर विरोधात आज निषेध मोर्चा काढण्यात आला होता, १३ पॉईंट रोस्टर रद्द करून पूर्वीचे २०० रोस्टर लागू करण्यात यावे, तसेच कुलगुरू, अधिव्याख्याता, पदांमध्ये आरक्षण लागू करावे, प्राद्यापक पदाच्या आरक्षित रिक्त जागा त्वरित पूर्णपणे भरण्यात याव्या अशा मागण्यासाठी हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता.
येथील मनुवादी सरकार शिक्षण व्यवस्थेमधून कशा पद्धतीने आदिवासी, एसी ,ओबीसी यांना शिक्षण व्यवस्थेमधून बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे , सध्या हि पद्धत केंद्रीय विद्यापीठात लागू झाली आहे राज्यातील विद्यापीठात लागू करण्याचा विचार येथील सरकारचा आहे आणि हे सरकार आपणाला चेक करण्याचाही प्रयत्न करत आहे कि आपण जागृत आहोत कि नाही असे येथील निषेध मोर्चाप्रसंगी बोलताना विद्यार्थी बोलत होते ,१३ पॉईंट रोस्टर धोका है धक्का मारो मौका है , मनुवाद से आझादी , अश्या प्रकारच्या घोषणा येथे देण्यात आल्या.
याप्रसंगी क्रांती सहाणे, अविनाश कांबळे, सागर सोनकांबळे, संतोष , किरण मोरे, आकाश दौंडे, मारुती कोकणे, सूर्यकांत गायकवाड, मयूर दामोदरे, सुरज गायकवाड, संविधान भालेराव, बिबीशन, वैभव गायकवाड,सोमा सोनवणे, मुन्ना आरडे, बाळासाहेब सोनवणे, डीजे वाघमारे तसेच विद्यापीठातील इतर विदयार्थी सहभागी झाले होते.