सातारा : बहुजननामा ऑनलाइन – Satara District Bank Election | सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) मोठा धक्का बसला असून गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई (Shambhuraj Desai), राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (NCP MLA Shashikant Shinde ) हे पराभूत झाले आहेत. (Satara District Bank Election) शशिकांत शिंदे यांचा केवळ १ मतांनी पराभव झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा धक्का बसला आहे.
पाटणमध्ये (Patan) शंभुराज देसाई व पाटणकर हे परस्परांचे विरोधक. पाटण प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर (Vikramsinh Patankar) यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर (Satyajeet Singh Patankar) यांनी ५८ मते मिळवून गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई (Minister of State for Home Affairs shambhuraj desai) यांचा पराभव केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जावळी (jawali ) सेवा विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा १ मताने धक्कादायक पराभव झाला. तेथे विरोधी ज्ञानदेव रांजणे (Gyandev Ranjane) विजयी झाले आहेत. शशिकांत शिंदे यांना २४ मते मिळाली तर रांजणे यांना २५ मते मिळाली.
सातारा जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होती.
त्यापैकी आमदार शिवेंद्रसिंह राजेंसह (Shivendraraje Bhosale) १० जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. रविवारी ११ जागांसाठी मतदान पार पडले होते. त्याची मतमोजणी आज सकाळी सुरु झाली. त्यातील पहिलाच निकाल शशिकांत शिंदे यांचा आला.
Web Title :- Satara District Bank Election | Minister of State for
Home Affairs Shambhuraj Desai and Shashikant Shinde losse in Satara District Bank Election while Vikramsinh Patankar and Gyandev Ranjane are won.
Anil Parab | शरद पवारांसोबत 4 तास चर्चा झाल्यानंतर विलीनीकरणाबाबत अनिल परबांची माहिती; म्हणाले…
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 43 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी