सातारा : बहुजननामा ऑनलाईन – Satara Crime | खासदार उदयनराजे (MP Udayanraje Bhosale) यांचे समर्थक आप्पा मांढरे (Appa Mandhare) यांच्यावर राजवाडा परिसरात दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी रात्री उशिरा गोळीबार (Firing) केला. त्यात मांढरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याघटनेने सातार्यात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी राजवाडा परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. (Satara Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार उदयनराजे समर्थक आप्पा मांढरे हे राजवाडा परिसरातील गोल बागेजवळ बोलत उभे होते. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन दोघे जण आले. त्यांनी मांढरे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्या त्यांच्या पोटात लागल्याने ते जागीच कोसळले.
त्यांच्याबरोबरच्या लोकांनी मांढरे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.
या घटनेची माहिती मिळताच शाहुपुरी पोलीस (Shahupuri Police) व सातारा शहर पोलिसांनी (Satara City Police) परिसराची नाकाबंदी केली होती. (Satara Crime)
Web Title :- Satara Crime | Firing at Udayanraj’s activities in Satara
हे देखील वाचा :
Gold Rate Today | तुळशी विवाहानंतर सोन्या-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Pune Crime | किरकोळ कारणावरून खुनाचा प्रयत्न, लोहगाव परिसरातील घटना