सातारा : बहुजननामा ऑनलाईन – Satara Crime | एका तरुणांन लग्नाच्या चौथ्याच दिवशी सातारा नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलनं आंदोलन करत आत्महत्येचा प्रयत्न करत केल्याची विचित्र घटना समोर आली आहे वेळीच पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्याने तरुणाचा जीव वाचवणं शक्य झालं आहे. बराच काळ समजावून सांगितल्यानंतर तरुणाला खाली उतरवण्यात आलं आहे. यावेळी बघ्यांनी एकच गर्दी (Satara Crime) केली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
संबंधित तरुण हा सातारा शहरातील गुरुवार पेठ (Guruwar Peth, Satara) परिसरात वास्तव्याला असून लग्नाच्या चौथ्याच दिवशी तरुणानं असं टोकाचं पाऊल उचलल्यानं गावात उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कौटुंबीक वादातून मानसिक ताण निर्माण झाल्यानं तरुण पाण्याच्या टाकीवर चढला आणि आत्महत्येचा प्रयत्न केला, पोलिसांनी या तरुणाची समजूत काढून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
दरम्यान या घटनेची माहिती परिसरात वाऱ्याच्या वेगात पसरली होती. त्यामुळे रविवारी दिवसभर
सर्वत्र याच घटनेची चर्चा होती. तुर्तास पोलिसांनी समुपदेशन करत तरुणाला मानसिक आधार दिला
आहे. तसेच आत्महत्या न करण्याचा सल्ला दिला आहे.
Web Title : satara crime after 4 days of marriage man attempt to suicide by climbing on water tank in satara
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | भांडण सोडविण्यास आलेल्या दोघा मेव्हण्यांनाच केली मारहाण