जेजुरी : जिल्हा नाभिक महामंडळाच्या माहिलाध्यक्षा पदी पिंपरी सांडसच्या उपसरपंच सौ सारिका सोमनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली.राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय अनारसे यांच्या हस्ते हे निवडीचे पत्र देण्यात आले .
सारिका शिंदे या हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस ग्रामपंचायतीच्या उपसरपंच असून समर्थ महिला उद्योजक परिवाराच्या त्या संस्थापिका आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांनी 200 महिलांना विविध व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे, तर एक हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे .महिला बालकल्याण समिती,दक्षता समिती, महिला भरोसा समितीवर त्या कार्यरत आहेत .तसेच अनेक महिला बचत गटाच्या त्या प्रमुख आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन सारिका शिंदे यांची जिल्हा महिलाध्यक्षपदी निवड केली.
राज्य प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय अनारसे, जिल्हाध्यक्ष पै निलेश पांडे, पदाधिकारी सुभाष जाधव,मारुतीआप्पा पंडित,नितीन राऊत,पुणे शहर अध्यक्ष महेश सांगळे, जिल्हा युवाध्यक्ष भारत मोरे, पुरंदर तालुका अध्यक्ष राहुल मगर,दौंड तालुका अध्यक्ष गणेश साळुंखे, अश्विनी बंड, दौंड शहर अध्यक्ष रवींद्र बंड आदी उपस्थित होते .