बहुजननामा ऑनलाइन टीम – SaReGaMaPa Winner Vaishali Bhaisane Made | महाराष्ट्रातील लोकप्रिय गायिका वैशाली भैसने-माडे (SaReGaMaPa Winner Vaishali Bhaisane Made) केलेल्या फेसबुक पोस्टने (Facebook Post) खळबळ उडाली आहे. वैशाली भैसने सोशल मीडियावर (Socila Media) सक्रीय असलेली पाहायला मिळते, मात्र माझ्या हत्येचा कट रचला जात असल्याचं फेसबुक पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या पोस्टमध्ये वैशालीने (Vaishali Bhaisane Made) चाहत्यांना पाठिंब्यांची मागणी केली आहे.
काय आहे फेसबुक पोस्ट –
काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय. 2 दिवसानंतर पत्रकार परिषद (Press Conference) घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे.आज मला तुमच्या support ची गरज आहे, असं वैशालीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. दोन दिवसांनंतर वैशाली काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
वैशाली भैस लोकप्रिय गायिका असून तिने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केलं आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट बाजीराव मस्तानीमधील (Bajirao Mastani) पिंगा (Pinga Song) हे गाणं तिने गायलं आहे. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. काही महिन्यांपुर्वी वैशालीने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. त्यासोबतच तिला विदर्भाचं अध्यक्षपदही देण्यात आलं होतं. (SaReGaMaPa Winner Vaishali Bhaisane Made)
दरम्यान, वैशालीला कोण त्रास देत आहे ?, तिला मारण्याचा कोण कट रचत आहे आणि कशासाठी ?, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दोन दिवसांनी वैशाली याबाबात खुलासा करणार आहे. वैशालीच्या चाहत्यांनीही तिला पाठिंबा दिला असून सोशल माध्यमांवर चर्चेचा विषय बनला आहे.
Web Title :- SaReGaMaPa Winner Vaishali Bhaisane Made | my life is in danger singer vaishali bhaisane mades shocking facebook post
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Stress Relief Tips | जर तुम्ही सुद्धा असाल Stress ने त्रस्त, तर ‘या’ 3 टिप्स करतील मन शांत
Sunny Leone-Online Crime | सनी लिओनीची ऑनलाईन फसवणूक,काढलं ‘इतक्या’ हजारांचं कर्ज !