पुणे : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra State Govt) सन्मानधन योजनेचा (Sanman Dhan Yojana) लाभ घेण्यासाठी घरेलू कामगारांनी ३१ मे २०२३ पूर्वी कामगार उपायुक्त कार्यालयात समक्ष हजर राहून अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक कामगार आयुक्तांनी (Assistant Labour Commissioner) केले आहे.
शासनाकडून ५५ ते ६० वयोमर्यादा पूर्ण केलेल्या आणि घरेलू कामगार कल्याण मंडळामध्ये (Gharelu Kamgar Kalyan Mandal) ३१ डिसेंबर २०२२ अखेर नोंदीत कामगारांना कामगार सन्मानधन योजनेअंतर्गत (Gharelu Kamgar Yojana) १० हजार रुपये मिळणार आहेत. त्यासाठी कामगार उपायुक्त कार्यालय (Deputy Commissioner of Labour), शक्ती चेंबर्स, सर्वे क्र. ७७/१, २ रा, 3 रा आणि ४ था मजला, संगमवाडी पुणे-४११००३ येथे हजार राहून अर्ज सादर करावा. (Sanman Dhan Yojana)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अर्जासोबत प्रपत्र अ, बँकेच्या पासबुकची सत्यप्रत, लाभार्थ्यांच्या ३१ डिसेंबर २०२२ पर्यंतच्या नोंदणीची किंवा नूतनीकरणाच्या पावतीची सत्यप्रत आणि आधारकार्डची सत्यप्रत सादर करावी, असेही कामगार उपायुक्त कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.
Web Title :- Sanman Dhan Yojana | Assistant Labour Commissioner: Domestic workers should update information to avail Sanman dhan Yojana, they will get Rs. 10,000
हे देखील वाचा :
Pune Crime News | पुणे पोलिसांकडून बनावट निकाहनामा बनवून तरूणीची बदनामी करणार्याला बुलढाण्यातून अटक