मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केल्यानंतर एकच गोंधळ उडाला. काही वेळाने शरद पवार सिल्व्हर ओक (Silver Oaks) या निवास्थानी गेले. त्यानंतर वाय.बी. चव्हाण सेंटर (YB Chavan Center) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले तर काही जण उपोषण करण्यास बसले. कार्यकर्ते उपोषणाला बसल्याचे शरद पवार यांना समजल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांना निरोप पाठविला. (NCP Chief Sharad Pawar)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अजित पवार (Ajit Pawar) यांनी घोषणाबाजी, आंदोलन, उपोषण करणार्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. अजित पवार यांनी शरद पवार यांचा निरोप कार्यकर्त्यांना दिला. अजित पवार म्हणाले, आजच्या कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्ते प्रेमापोटी आले होते. पवार साहेब असा काही निर्णय घेतली असं कोणालाही वाटलं नव्हतं.
Mumbai, Maharashtra | Sharad Pawar will take two to three days to rethink his decision (of stepping down as NCP chief), says NCP leader Ajit Pawar as he holds talks with protesting party workers pic.twitter.com/c6D1YSPI0n
— ANI (@ANI) May 2, 2023
विचार करायला दोन ते तीन दिवस द्या असं शरद पवारांनी म्हटलं आहे. माझ्यावर अवलंबून असतील तर माझं ऐकलंच पाहिजे असा निरोप त्यांनी दिला. हट्टीपणा बरोबर नाही. प्रत्येकाने आपापल्या घरी जावे असे अजित पवार यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- NCP Chief Sharad Pawar | sharad pawar will take two to three days to rethink his decision says ncp ajit pawar
हे देखील वाचा :