पुणे : बहुजननामा ऑनलाईन– Pune Crime News | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे Maharashtra Navnirman Sena (MNS) पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्या मुलाला शिवीगाळ करून बघुन घेण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये (Kondhwa Police Station) अदखलपात्र गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.
साईनाथ बाबर हे कोंढव्यातील एनआयबीएम रोडवरील (NIBM Road Kondhwa) एलिगंजा फेज या इमारतीमध्ये रहावयास आहे. त्यांच्याच सोसायटीमध्ये राहणार्या एका महिलेने त्यांच्या 16 वर्षीय मुलाला शिवीगाळ करून बघुन घेण्याची धमकी दिली आहे. याबाबत साईनाथ बाबर यांच्या पत्नी आरती साईनाथ बाबर (Aarti Sainath Babar) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून कोंढवा पोलिसांनी एका महिलेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत अधिक माहिती अशी की, बाबर यांचा 16 वर्षाचा मुलगा आणि इतर जण हे सोसायटीमध्ये सोमवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास खेळत होते. त्यावेळी महिलेने बाबर यांच्या मुलाजवळ जावुन शिवीगाळ केली तसेच येथे खेळला तर बघुन घेते अशी धमकी दिली. गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Kondhwa Police Station – 16-year-old son of MNS city president Sainath Babar threatened
हे देखील वाचा :
Pune Cyber Crime News | टेलिग्राम ग्रुपवर ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने 16 लाखांची फसवणूक
Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – 17 वर्षीय मुलीवर बलात्कार