कोल्हापूर न्यूज (Kolhapur News) : बहुजननामा ऑनलाइन – Sanjay Ghodawat | कोल्हापुरातील (Kolhapur) घोडावत उद्योग समूहाचे संजय घोडावत (Sanjay Ghodawat) यांच्याकडून 5 कोटीची खंडणी (Extortion of 5 crore) उकळण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. खंडणी न दिल्यास घोडावत यांच्यासह कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी एका आरोपीला पोलिसांनी हातकणंगले येथून अटक केली आहे. घोडावत यांच्याकडून खंडणी वसुलीचा प्रयत्न झाल्याने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.
Sanjay Ghodawat | kolhapur extortion of 5 crore from famous businessman sanjay ghodawat
रमेशकुमार प्रजापती ठक्कर असे खंडणी मागणा-या आरोपीचे नाव असून हातकणंगले पोलिसां(Hatkanangale police)नी त्याला अटक केली आहे.
तर दिल्लीचा रहिवासी असलेला ठक्करचा साथीदार व्ही. पी. सिंग पसार झाला आहे.
आरोपीकडून 1 लाख रुपयांची रोकड, 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि एक्स्क्लुझिव्ह डायरी असं लिहिलेली वही पोलिसांनी जप्त केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, संजय घोडावत जयसिंगपूर (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येेथे राहतात.
13 ते 18 जून या कालावधीत त्यांना व्हॉट्सअॅप मेसेज, एसएमएस आणि व्हॉट्सअॅप कॉल(WhatsApp messages, SMS and WhatsApp calls) करुन आरोपींनी 5 कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
घोडावत यांच्यासह त्यांचे भागीदार निलेश बागी (Nilesh Bagi) (रा. बेळगाव) यांनाही अशाच प्रकारची धमकी दिल्याचा दावा तक्रारीत केला आहे.
हातकणंगले पोलीस तपास करत आहेत.
Web Title : Sanjay Ghodawat | kolhapur extortion of 5 crore from famous businessman sanjay ghodawat
Narendra Patil । नरेंद्र पाटील यांचा सवाल, म्हणाले – ‘मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवार उदासीन का ?’
Amit Lunkad News | फसवणूक प्रकरणात बिल्डर अमित लुंकड यांचा जामीन मंजूर