Sangli Crime News | मिरजमध्ये बँक कर्मचाऱ्याकडून ग्राहकांना 90 लाखांचा गंडा

Pune Pimpri Chinchwad Crime | 21 lakhs to the company by deactivating the SIM card of the company; Type in Chinchwad MIDC

मिरज : बहुजननामा ऑनलाईन  – Sangli Crime News | सांगली जिल्ह्यातील अ‍ॅक्सिस बँकेच्या मिरज शाखेतील 10 ग्राहकांना सुमारे 90 लाख 61 हजार 128 रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची घटना रविवारी घडली आहे. याप्रकरणी बँकेचा कर्मचारी तोहिद अमीर रिकमसलत (वय 27, रा. मिरज) याच्याविरूद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात ग्राहकांची फसवणूक (Cheating Case) केल्याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Sangli Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

10 जणांची करण्यात आली फसवणूक
यामध्ये रिसाज दादापीर कोतवाल (मिरज) अमिना नजीर शेख (गुरुवार पेठ, मिरज), अशोक जिनगोंडा पाटील (मानमोडी रोड, कळंबी), समीर वजीर जमादार (मिरज), वाजिदा शमशुद्दीन कोतवाल, आशिया शमशुद्दीन चाऊस (मिरज), रमेश जमराम सेवानी (मंगळवार पेठ, मिरज), हुसेन इमाम बेपारी (वखारभाग, मिरज), गणी युसूफ गोदड (टाकळी रोड, मिरज), मेहबूब अल्ल्लाबक्ष मुलाणी (मिरज) अशी फसवणूक करण्यात आलेल्या ग्राहकांची नावे आहेत. (Sangli Crime News)

 

या फसवणुकीप्रकरणी बँकेचे साजिद बाबालाल पटेल (वय 38, रा. विजयनगर, सांगली) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
आरोपी तोहिद रिकमसलत याच्याकडे बँकेच्या ग्राहकांना भेटून सेव्हिंग व करंट खाते उघडण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
यानंतर रिकमसलत याने ग्राहकांचा विश्वास संपादन करून स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता ग्राहकांकडून काही रक्कम घेतली.
तसेच ग्राहकांच्या खात्यावरूनदेखील त्याने काही रक्कम काढून घेतली. रिकमसलत याने एप्रिल 2019 ते दि. 16 फेब्रुवारी 2023 या कालावधीत त्याने ग्राहकांची 90 लाख 61 हजार 128 रुपयांची फसवणूक केली.
यानंतर ग्राहकांच्या तक्रारीनंतर बँकेने रिकमसलत याची चौकशी केली असता तो त्यामध्ये दोषी आढळून आला.
त्यामुळे बँकेने त्याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

 

 

Web Title :- Sangli Crime News | 90 lakhs extortion from bank employee to customers in Miraj

 

हे देखील वाचा :

Nashik Crime News | भावाला नोकरीला लावून देण्याच्या बहाण्याने आरोपींकडून महिलेला 20 लाखांचा गंडा

MC Stan | “त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला…” एमसी स्टॅनचा मोठा खुलासा

MNS Chief Raj Thackeray | ‘राज ठाकरेंनी वाचन वाढवावं’ म्हणाऱ्यांना राज ठाकरेंचा टोला, म्हणाले – ‘मी जेव्हा चार दुऱ्या टाकतो, तेव्हे ते…’

Vh1 Supersonic | भारताचा स्वतःचा बहु-शैली संगीत आणि जीवनशैली महोत्सव, व्हीएच1सुपरसॉनिक, पुण्यात