मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – आमदारांनी केलेल्या उठाव यशस्वी झाला नसता, तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वत:वर गोळी (Firing) झाडून घेतली असती, असा खळबळजनक दावा शालेय शिक्षणमंत्री (Education Minister) दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. यावर राजकीय वतर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आता संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी यावर प्रतिक्रिया देताना वेगळं वक्तव्य केलं आहे. मी सुरवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत होतो. अशी काही परिस्थिती निर्माण झाली नव्हती, असं संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी सांगितले.
संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) हे एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्याबरोबर असणाऱ्या आमदारांपैकी एक होते. त्यांनी दिपक केसरकर यांच्या वक्तव्यावर वेगळी प्रतिक्रिया देताना भुमरे म्हणाले, केसरकर काय म्हणाले, काय नाही, ते मला माहिती नाही. मला एवढंच सांगायचंय की, मी सुरुवातीपासूनच त्यांच्याबरोबर होतो. पहिल्या टप्प्यात त्यांच्याबरोबर जे आमदार गेले त्यात मी होतो.
भुमरे पुढे म्हणाले, मी सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर होतो, अगदी शेवटपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो. इथून निघाल्यापासून त्यांच्या गाडीतच होतो, परंतु अशी काही परिस्थिती निर्माण झाली नव्हती. केसरकर यांनी त्यांचं काही वैयक्तिक मत व्यक्त केलं असेल तर ते मला काही माहिती नाही. परंतु मला एवढंच सांगायचं की, मी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर होतो. तेव्हा ज्या काही घडामोडी झाल्या त्या सगळ्या मला माहिती आहेत. तसेच नैराश्य वगैरे असं काही नव्हतं, असं संदीपान भुमरे म्हणाले.
काय म्हणाले दीपक केसरकर?
अस्मितेसाठी एकनाथ शिंदेंनी बंड केलं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वचन द्यायचे आणि तोडायचे.
शिंदेंना खालच्या दर्जाची वागणूक दिली. एकनाथ शिंदे हे विधिमंडळाचे नेते होते. त्यांचा अपमान का केला? याचं उत्तर दिलं पाहिजे. एकनाथ शिंदे तेव्हा म्हणाले होते जेव्हा वाटेल उठाव यशस्वी होणार नाही, तेव्हा एकच गोष्ट केली असती. माझ्याबरोबर असलेल्या सर्व आमदारांना परत पाठवलं असतं आणि माझ्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती, असा खळबळजनक दावा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला होता.
Web Title : Sandipan Bhumre | sandipan bhumre refutes deepak kesarkar claim eknath shinde would have shot himself