कणकवली : बहुजननामा ऑनलाइन – भाजपने कणकवली तालुकाध्यक्ष संदेश पटेल, अतुल रावराणे, संदेश पारकर, वैभववाडीचे सभापती लक्ष्मण रावराणे यांची भाजपमधून हाकालपट्टी केल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली. कणकवली मतदार संघात भाजपचा उमेदवार असूनही विरोधी उमेदवाराचा प्रचार करून शिस्तभंग केल्याच्या कारणावरून या नेत्यांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणकवली दौरा झाला, या वेळी कोकण संघटन मंत्री सतीश धोंड, संपर्क मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या चारही नेत्यांची भाजप पक्षातून हकालपट्टी करण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार पुढील ६वर्षांसाठी या नेत्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान निर्णय घेण्यापूर्वी या चारही नेत्यांना चर्चा करण्यासाठी संपर्कमंत्री रवींद्र यांनी कणकवली येथे बोलावले होते, परंतु संदेश पारकर यांच्या व्यतिरिक्त इतर नेते तिथे उपस्थित राहिले नाही, अशी माहिती जठार यांनी दिली.
तसेच जठार म्हणाले कि, संदेश पारकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली, संदेश पारकर आणि अतुल रावराणे यांना कुठलेही पद नव्हते, तरी ते बिन पदी फुल अधिकारी म्हणून मिरवत होते, मात्र त्यांची आता भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Visit : bahujannama.com