Sambhaji Raje | CM शिंदेंनी छत्रपती संभाजीराजेंना दीड तास ताटकळत उभे ठेवले

Sambhaji Raje | eknath shinde not gave time to meet chatrapati sambhaji raje they are waiting for one and a half hours in mantralaya on maratha reservation issue

बहुजननामा ऑनलाइन टीम – Sambhaji Raje | आज दुपारी छत्रपती संभाजीराजे भोसले हे मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी मंत्रालयात गेले होते. येथे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना दीड ते दोन तास ताटकळत ठेवण्यात आले. अखेर छत्रपती संभाजीराजे यांना मुख्यमंत्री कार्यालयातून निघून जावे लागले. (Sambhaji Raje)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मंत्रालयात आल्यानंतर संभाजीराजे यांनी प्रथम सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट घेतली आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा आढावा घेतला. यानंतर ते मराठा समाजाचे समन्वयक व समाजाचे प्रतिनिधी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनाकडे गेले.

 

परंतु, मुख्यमंत्री शिंदे यांनी तब्बल दीड ते दोन तास माजी खासदार संभाजीराजे यांना बाहेर ताटकळत उभे ठेवले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत दंग होते.
वारंवार निरोप देऊनही शिंदेंनी भेट देण्यास टाळाटाळ चालवल्याचे जाणवताच अखेर संभाजीराजे तडकाफडकी निघून गेले. (Sambhaji Raje)

दरम्यान, या प्रकारावर संभाजीराजे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

Web Title :- Sambhaji Raje | eknath shinde not gave time to meet chatrapati sambhaji raje they are waiting for one and a half hours in mantralaya on maratha reservation issue

 

हे देखील वाचा :

Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray | टक्केवारीमुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेला, माझ्याकडे पुरावे; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप

Vitamin-C | केवळ लिंबू आणि संत्र्यातच नव्हे, ‘या’ 5 फूड्समध्ये सुद्धा असते व्हिटॅमिन-सी चे भरपूर प्रमाण

Pune Police Inspector Transfer | पुणे शहर पोलिस दलातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या ! लोणी काळभोर, खडकी आणि सहकारनगरमध्ये बदल