नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सैनिकांना मिळणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेवर आवाज उठवनाऱ्या तसेच वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी रिंगणात उतरलेल्या तेज बहाद्दूर यादव यांची उमेदवारी निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. तेज बहाद्दूर यादव यांची उमेदवारी रद्द होणे हा समाजवादी पार्टी आणि बसपासाठी एक झटका आहे. सपा-बसपाने तेज बहाद्दूर यादव यांना उमेदवारी दिली होती. तेज बहाद्दूर यादव यांना बीएसएफमधून बडतर्फ करण्यात आले आहे.
मात्र, तेज बहादूर यादव यांचा अर्ज निवडणूक आयोगाकडून रद्द करण्यात आल्यामुळे. त्यांनी यानंतर सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी दर्शविली असून पंतप्रधान मोदींविरोधात लढण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे.
दरम्यान, तेज बहाद्दूर यादव निवडणूक रिंगणातून बाहेर गेल्यामुळे आता पंतप्रधान मोदी आणि काँग्रेसचे अजय राय यांच्यातच मुख्य लढत रंगेल. सपा-बसपा काँग्रेसला उमेदवाराला पाठिंबा देईल कि नाही याबाबत अजून काही समोर आलेले नाही.