बहुजननामा ऑनलाईन टीम – 6 डिसेंबर 2020 : इन्स्टावर जारा खानला बलात्काराची धमकी देणार्यास पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत जारा खानने मुंबईच्या ओशिवरा पोलिस ठाण्यामध्ये इन्स्टाग्रामवर बलात्काराची धमकी मिळाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केलीय. याप्रकरणी पोलिसांनी 23 वर्षांच्या एका तरूणीला अटक केलीय.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जारा खानला बलात्काराची धमकी देणारी आरोपी मुलगी हैदराबाद इथली आहे. ती एमबीए शाखेतील विद्यार्थीनी आहे. नूरा सरवर असे तिने नाव आहे. इन्स्टाग्रामवर तिने आपले बनावट प्रोफाईल बनवलंय.
नूरा आणि तिचा को-वर्कर एका राजकीय पक्षासाठी काम करत असून ते जारा खानला धमक्या देत होते. जाराने इन्स्टाग्रामवर बलात्काराच्या धमक्या मिळत असल्याची तक्रार दाखल केलीय. तिची तक्रार सायबर सेलकडे पाठविली होती. यानंतर पोलिस आयपी अॅड्रेसच्या माध्यमातून आरोपीपर्यंत पोहोचले.
आई सलमा आगा यांच्या पावलावर पाऊल ठेवत जारा खान अभिनयामध्ये नशीब आजमावतेय. अर्जुन कपूरच्या अपोझिट ‘औरंगजेब’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर ‘देसी कट्टा’ या सिनेमामध्येही ती दिसली होती.
मूळच्या पाकिस्तानी वंशाच्या असलेल्या सलमा आगा यांचा जन्म लंडन इथे झालाय. लंडनमध्येच त्यांचे बालपण गेले असून कोणत्याही तरुणीला रुपेरी पडद्याची भुरळ पडावी तशी ती सलमा आगा यांनाही पडलीय. त्या बॉलिवूडकडे आकर्षित झाल्या.
बी.आर. चोप्रा यांच्या ‘निकाह’ सिनेमातून सलमा आगा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सलमा आगा यांच्याकडे घायाळ करणारे सौंदर्य, अभिनय कौशल्यासह मधुर सूरांची देणगी होती. त्यामुळे पहिल्या सिनेमात त्यांना अभिनयासह पार्श्वगायनाची संधी लाभली होती.