मुबंई बहुजननामा : एका कार कंपनीच्या सेल्स एक्झिक्युटिव्हने आपल्याच ग्राहकाच्या पत्नीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबई परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी श्याम अभिमन्यू मसकेला अटक करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. एका बिझनेस डील करीता पीडित महिला आरोपीला भेटण्यास आली होती. भेट झाल्यानंतर महिला निरोप घेत असताना त्याने तिचे चुंबन घेतले, परंतु महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले, त्यानंतर आरोपीने तिच्या सोबत बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली. दोघेही बाहेर फिरायला गेले असता हॉटेल मध्ये त्याने तिच्या दारूमध्ये गुंगीचं औषध मिसळलं, नंतर तिच्यावर बलात्कार केला . त्याने बलात्काराचा विडिओ देखील काढला.
काही दिवसांनी आरोपी पुन्हा पीडितेला भेटला , त्याने पून्हा बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु महिलेने नकार देताच त्याने तिला तो विडिओ दाखवला आणि तुझ्या पतीला देखील हा विडिओ पाठवेल अशी धमकी देखील दिली. घाबरलेल्या महिलेने त्याला होकार दिला. याच संधीचा फायदा घेत त्याने महिलेवर दोन – तीन वेळा बलात्कार केला. महिलेने दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आरोपीने तो विडिओ डिलीट करेल असे सांगितले , परंतु त्याने विडिओ डिलीट केला नाही.
महिन्याभरानंतर त्याने पुन्हा पीडित महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिलेने संपूर्ण हकीकत आपल्या नवऱ्याला सांगितली. दोघांनी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली, पोलिसांनी त्याला त्याच्या महाडच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी मसकेचा मोबाईल जप्त केला असून त्यात पीडितेचे आक्षेपार्ह फोटोज आणि विडिओ त्यांना सापडले आहेत.