मुंबई: बहुजननामा ऑनलाईन – सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या कारवाईसाठी एनआयए चा तपास महत्त्वपूर्ण ठरला आहे. एनआयएने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेकडे तपास करत असताना त्याच्याकडून डायरी आणि बार मालक महेश शेट्टीच्या जबाब घेतला होता. त्यावरून गैरव्यवहार होत असल्याच्या आरोपाला पुष्टी मिळाली आहे.
शनिवारी सीबीआयने विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात ऐवज जप्त केला आहे. त्याची छाननी करण्यात येत असून एनआयएने वाझेकडून जप्त केलेल्या डायरीत कोडवर्डमध्ये वसुलीच्या नोंदी असून एनआयएने मुंबईतील बारमालक महेश शेट्टी याची चौकशी केली होती. त्यामध्ये शेट्टीने वाझेला एकूण एक कोटी ५५लाख रुपये दिल्याचे सांगितले. यामुळे अधिकाऱयांनी हप्ता वसुली झाल्याचे मत व्यक्त केले आहे.