मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Sachin Vaze | निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) न्या. चांदीवाल आयोगासमोर हजर झाला. त्यावेळी सचिन वाझे (Sachin Vaze) याने चांदीवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) मोठा गौप्यस्फोट केला आहे. मी निलंबित (Suspended) असल्याच्या काळात देखील मुंबई पोलीस (Mumbai Police) दलाच्या नव्हे तर देशातील अन्य काही तपास (investigation) यंत्रणांच्या तपास कार्यात सहभागी होत असे, असा गौप्यस्फोट वाझे यांनी केला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) सोमवारी पुन्हा एकदा चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी त्यांचे वकील गिरीश कुलकर्णी (Lawyer Girish Kulkarni) यांनी सचिन वाझेला (Sachin Vaze) काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना उत्तर देताना सचिन वाझे म्हणाला की, निलंबनाच्या काळात मी मुंबई पोलीस मुख्यालयाशी (Mumbai Police Headquarters) संलग्न होतो. पण जणू काही मी सेवेत आहे, अशा पद्धतीने अनेक प्रकारच्या तपासात माझी मदत घेतली जात होती. घटनास्थळाचे पंचनामे करणे, संबंधितांचे जबाब नोंदविणे, साक्षीदार, संशयित यांचा तपास करणे ही कामे मी करीत असल्याचे वाझे याने सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पत्रकार अर्णब गोस्वामी (Journalist Arnab Goswami) यांच्या अटकेच्या वेळी रायगड पोलिसांनी (Raigad police) माझी मदत घेतली होती.
तसे मी मुंबई सहपोलीस आयुक्तांच्या निर्देशावरुन केले होते, असे सचिन वाझेने स्पष्ट केले.
वाझेची उलटतपासणी आज (मंगळवार) होणार आहे. आज सचिन वाझे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Title :- Sachin Vaze | even during period suspension i used carry out investigations said sachin vaze in front of chandiwal commission.