मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – आज ‘व्हॅलेंटाईन डे’, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. आज जगभर Valentine Day मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मग अशा वेळी आपल्याला आपलं पहिलं प्रेम नाही आठवलं तरच नवल…खरं तर पहिल्या प्रेमाची आठवण प्रत्येकालाच असते. आता क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यानेही आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तुम्हाला वाचून धक्का बसेल करणं त्याचं पहिलं प्रेम त्याची पत्नी अंजली नाही तर कुणी दुसरंच आहे. सचिनने आपल्या पहिल्या प्रेमाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्याला त्याने ‘My First Love’ असं कॅप्शन देखील दिलं आहे.
‘क्रिकेट’ हेच पाहिलं प्रेम
तर ‘क्रिकेट’ हेच आहे आपल्या मास्टर ब्लास्टरचे ‘पहिलं प्रेम’. Valentine Day चं औचित्य साधत त्याने नेटप्रॅक्टिस करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. 17 हजारांहून जास्त युजर्सनी हा व्हिडीओ पाहिला आहे आणि हजारो सचिन फॅन्सनी त्यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. भारतामध्ये ‘क्रिकेट म्हणजे सचिन’ असं समीकरण आहे आणि सचिनला खेळताना पाहणं म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असतं. त्यामुळे सचिनने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर त्यावर अक्षरश: कमेंट्सचा पाऊस पडला.
https://twitter.com/sachin_rt/status/1228212333245190144
भारतातील अनेक फेव्हरेट जोड्यांपैकी क्रिकेटपटू सचिन आणि अंजली यांची जोडी अनेकांची आवडती जोडी आहे. यंदाच्या व्हॅलेन्टाईन्स डे ला सचिनने आपले पहिले प्रेम क्रिकेटच असल्याचे सांगितले आहे.
https://twitter.com/ICC/status/1226375975115476993