मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – आठवड्याभराच्या राजकीय घडामोडीनंतर अखेर अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक (Andheri By Election) बिनविरोध होणार आहे. भाजपने (BJP) या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुरजी पटेल (Murji Patel) हे भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) संयुक्त उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. त्यामुळे आता ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपच्या माघारीनंतर ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते. सर्व पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून जी पत्रे गेली आणि त्यांनी माझे दिवंगत पती रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या कामाबद्दल जी प्रशंसा केली, त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. तसेच रमेश लटके यांचे सर्वांसोबत सहकार्याचे नाते होते. प्रत्येकजण म्हणत होते, ते आमचे सहकारी होते. त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून आज मला सर्वांचा आशीर्वाद मिळाला आहे. त्यामुळे मी सर्वांची ऋणी आहे, असे ऋतुजा लटके (Rutuja Latke) म्हणाल्या.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भाजपने घेतलेल्या माघारीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे- Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती.
तसेच रमेश लटके आपला सहकारी असल्याचे देखील सांगितले होते. त्यावर भाजपने आपला उमेदवार मागे घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar)
यांनी देखील ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन सर्वच पक्षांना केले होते.
त्यामुळे आता ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा विजयाचा आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Web Title :- Rutuja Latke | andheri by election rutuja latkes first reaction after bjp withdrew from the election
हे देखील वाचा :
Pune Crime | महिलेकडे 40 लाखाची खंडणी मागणारा इराणी गुन्हे शाखेकडून गजाआड
Hasin Jahan | मोहम्मद शमीच्या बायकोला ट्रेनमध्ये आला वाईट अनुभव, TC वर केले गंभीर आरोप
Sajid Khan | ‘मी अनेक मुलींसोबत…’; साजिद खानने केला धक्कादायक खुलासा
IND vs AUS Warm up Match | KL Rahul च्या हाफ सेंच्युरीने टीम इंडियाची दमदार सुरुवात