बहुजननामा ऑनलाईन टीम : काही महिलांनी आयएएस महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात प्रवेश करत एकच गोंधळ उडवला. एवढेच नव्हे तर संतप्त भाजपच्या महिलांनी आयुक्तांकडे काळ्या आणि लाल बांगड्या फेकल्या आणि त्या अधिकाऱ्याला साडी देखील घालण्याचा प्रयत्न केला. सभाजित यादव असे या मनपा अधिकाराचे नाव असून आयुक्त म्हणाला की, मी सकारात्मक विचारांचा आहे. जर तुम्हाला बांगड्या द्यायचाच असतील तर या महिलांनी करवा चौथच्या निमित्ताने गरीब महिलांना बांगड्या द्याव्यात, त्यांच्याकडून आशीर्वाद मिळेल.
वास्तविक, सभाजित यादव यांनी मनपा आयुक्त पदी कार्यभार संभाळल्यापासूनच भाजपने त्यांना विरोध दर्शविला आहे, कारण यादव यांनी भाजप सरकारच्या काळात अनेक घोटाळ्यांना उघडकीस आणले होते. त्यामुळे संतप्त भाजपच्या महिला कार्यकर्त्यां आक्रमक झाल्या आणि त्यांनी या अधिकाऱ्याला बांगड्या भरून तसेच साडी घालायचा प्रयत्न करून निषेध व्यक्त केला जात आहे, असे म्हंटले जात आहे , दरम्यान यापूर्वीदेखील भाजपा खासदार जनार्दन मिश्रा यांनी आयएएस सभाजित यांना जिवंत गाडण्याचा इशारा देखील दिला होता.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, महिला मोर्चाने निषेधाच्या पूर्ण तयारीसह महानगरपालिका कार्यालय गाठले. मनपा अधिकारी दररोजप्रमाणे कार्यालयात बसले होते. त्याचवेळी भाजप महिला मोर्चाच्या महिलांनी जोरदार गोंडाळ उडवला. आयुक्तांना काही समजण्याआधीच महिलांनी त्यांना साडी नेसवण्याचा प्रयत्न केला महिलांनी मनपा आयुक्त आयएएस सभाजित यादव यांच्यावर काळ्या बांगड्या फेकल्या. या घटनांच्या वेळी कार्यलयात पोलिस घटनास्थळी उपस्थित होते, परंतु ते थांबू शकले नाहीत.
दरम्यान भाजप महिला मोर्चा आयुक्तांच्या कामकाजावरून नाराज आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात आयुक्त सभाजित यादव यांनी राजकीय पक्षांना विरोध करण्याचा मार्ग विचारात घेतला आहे. सभाजित यांनी महिलांविरोधात तक्रार दाखल केलेली नाही. पण एक सूचना देत सभाजीत म्हणाले कि, कोणी शेपटीला आग लावत तर कुणी स्मशानभूमीत धरणा आंदोलन करत तर कोणी बांगड्या भरत . तरी मी सकारात्मक आहे जर तुम्हाला बांगड्या द्यावयाच्या असतील तर या महिलांनी करवा चौथवर गरीब महिलांना बांगड्या द्याव्यात, त्यांच्याकडून आशीर्वाद मिळेल. मी विकास कामे करत असल्यास, काही लोक त्रस्त आहेत.
Visit : bahujannama.com