मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – दुचाकीवरून ट्रिपल सीट आलेल्या दरोडेखोरांनी (robbers) ज्वेलर्स दुकानावर दरोडा (Robbery at a jewelers shop) टाकून ज्लेवर्स मालकाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना मुंबईतून (Mumbai)समोर आली आहे. दहिसर (Dahisar) येथील गावडे परिसरात बुधवारी (दि. 30) सकाळी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या करुन तिघेही आरोपी पसार झाले झाले होते. त्यापैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्या आणखी दोघा साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. robbery in dahisar jewelers owner shot dead in firing
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
शैलेंद्र पांडे (वय 45) असे खून झालेल्या ज्वेलर्स मालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर येथील गावडे परिसरात ओम साईराज ज्वेलर्स या दुकानात 3 तरुण सोने घेण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून आले. तिघांनी बंदुकीचा धाक दाखवून ज्वेलर्स दुकान लुटायला सुरुवात केली. मात्र त्यांना ज्वेलर्सचा मालक शैलेंद्र पांडे याने विरोध केला. त्यामुळे आपल्याला दरोडा टाकता येणार नाही, आपण पकडले जाऊ या भीतीने दरोडेखोरांनी शैलेंद्र पांडे याच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत पांडे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी धाव घेतली. या तिन्ही दरोडेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलिसांच्या हाती लागली असून या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे तिघेही स्पष्ट दिसून येत आहेत. मुंबई गुन्हे शाखा आणि दहिसर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Web Titel : robbery in dahisar jewelers owner shot dead in firing
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Kisan Credit Card साठी अर्ज करण्याची मुदत आली जवळ, जाणून घ्या कशी आहे पद्धत