बहुजननामा ऑनलाइन टीम – कॅलिफोर्निया : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच मोठी रस्ते दुर्घटना(Road accident) घडली आहे. मध्य कॅलिफोर्नियामध्ये दोन वाहनांची समोरा-समोर धडक झाल्याने 9 लोकांचा मृत्यू झाला, यामध्ये 7 मुलांचा समावेश आहे. अधिकार्यांनी ही माहिती दिली.
फ्रेस्नो काऊंटी कोरोनरच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले की, शुक्रवारी सायंकाळी सुमारे आठ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गाडीतून प्रवास करणारी सात मुले एकमेकांशी संबंधित होती आणि हे वाहन एक महिला चालवत होती. तेव्हा समोरू येत असलेल्या एका वाहनावर त्यांचे वाहन आदळले. दुसर्या वाहनाच्या चालकाचे नाव चेडेनियल लूना (28) आहे.
धडक एवढी भीषण होती की, फोर्ड गाडीत आग लागली आणि यामध्ये गाडीतील सात मुलांसह सर्व आठ लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत दुसरा चालक लूना याचाही मृत्यू झाला.