बहुजननामा ऑनलाइन टीम – सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती कचाट्यात सापडली आहे. जसजशी या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, तसतसे रियाबद्दल नवीन गोष्टी आणि नवीन खुलासे केले जात आहेत. या दरम्यान रियाने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे जो तिच्या बिल्डिंगमधून रेकॉर्ड झाला आहे.
दरम्यान, रियाने 24 जुलै रोजी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात तिने सुशांत सिंहचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ या चित्रपटाचे प्रमोशन केले होते. 24 जुलै नंतर रिया आज पुन्हा इंस्टावर अॅक्टिव आहे आणि तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात तिच्या कुटुंबीयांना सध्या काय त्रास होत आहे, हे या कॅप्शनमध्ये लिहिले.
हा व्हिडिओ रियाच्या बिल्डिंगमधून शूट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रियाचे वडील दिसून येत आहेत, ज्यांना माध्यमांनी घेराव घातला आहे. व्हिडिओ सामायिक करताना अभिनेत्रीने लिहिले की, “हा माझ्या इमारतीतील कंपाऊंडचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारा माणूस माझे वडील इंद्रजित चक्रवर्ती (सेवानिवृत्त लष्करी अधिकारी) आहे. ईडी, सीबीआय आणि विविध तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण मला आणि माझ्या कुटुंबाला धमक्या येत आहेत. याबाबत आम्ही स्थानिक पोलिसांना सांगितले, तिथेही गेलो पण आम्हाला काहीच मदत मिळाली नाही. आम्ही यासंदर्भात तपास यंत्रणांनाही सांगितले पण त्यांच्याकडूनही कोणतीही मदत मिळाली नाही. अशाप्रकारे हे कुटुंब कसे जिवंत राहील. आम्ही फक्त मदत करण्यास सांगत आहोत. आमचे संरक्षण करण्यासाठी मुंबई पोलिसांना विनंती आहे जेणेकरून आम्ही तपास यंत्रणांना सहकार्य करू शकू. #safetyformyfamily ‘.