बहुजननामा ऑनलाइन टीम – सैराट सिनेमानंतर रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले. इतकेच नाही तर सैराट या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले. एका रात्रीत रिंकू(Rinku Rajguru) महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटानंतर रिंकू राजगुरूचा फॅन फॉलोव्हिंगदेखील चांगलाच वाढला. रिंकू सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिथून चाहत्यांशी संवाद साधत असते. रिंकू काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये छूमंतर चित्रपटाचे (chhumantar) शूटिंग करत होती. मात्र आता लंडनमधील शूटिंग पूर्ण करून ती भारतात (returned-home) परतली आहे. इतकेच नाही तर प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी, ऋषी सक्सेना आणि श्रीनिवास पोकळे हेदेखील मायदेशी परतले आहेत. आता सर्वांनाच या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.
रिंकू राजगुरू हिने इंस्टाग्रामवर लंडनमधील फोटो शेअर करत लिहिले, की बाय बाय लंडन, बॅक टू इंडिया. तसेच या चित्रपटातील इतर कलाकारही सोशल मीडियावरून लंडनवरून भारतात परतल्याचे पोस्टच्या माध्यमातून सांगितले. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना यांना एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे दिसणार आहे.