नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Modi Cabinet Reshuffle – Eknath Shinde Group | केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. सध्या मोदी सरकारच्या (Modi Government) मंत्रिमंडळात 77 सदस्य आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी एक मजबूत टीम तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 11 राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे नव्या चेहर्यांना संधी देण्याचे कठीण काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे आहे. (Modi Cabinet Reshuffle – Eknath Shinde Group)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महत्त्वाची मंत्रालये पाहणार्या काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने त्यांचे विभाग बदलले जाऊ शकतात किंवा त्यांना बाहेरचा दरवाजा दाखविला जाईल. शिंदे गटालाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. जनता दल युनायटेड आणि शिवसेना मंत्रिमंडळातून यापूर्वीच बाहेर पडले आहेत.
शिवराजसिंह चौहान यांना दिल्लीला बोलाविण्याचा विचार मोदी करत आहेत.
चौहान यांच्या ऐवजी तिथे नवा चेहरा दिला जाईल.
तसेच मत्स्य व्यवसायमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या अनुभवाचा अगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उपयोग केला जाऊ शकतो.
मंत्रिमंडळात मुस्लिमांना प्रतिनिधित्व न दिल्याने चुकीचा संदेश गेला आहे.
तसेच अलिकडेच सरसंघचालक मोहन भागवत यांनी मशिद आणि मदराशांना भेटी दिल्याने एक वेळा संकेत बाहेर गेला आहे.
2024च्या निवडणुका लक्षात घेऊन भाजपाने संघटनात्मक परिवर्तन केले आहे.
2019 मध्ये विजय मिळवू न शकलेल्या 144 लोकसभा मतदारसंघात आपल्या उमेदवारांचा विजय निश्चित
करण्याचे काम पदाधिकार्यांवर सोपवले आहे.
लवकरच राज्यपालांचेही परिवर्तन होऊ शकते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- reshuffle in union cabinet shinde group is also likely to be included modi governmnet
हे देखील वाचा :
Body Detoxification Food | बॉडी डिटॉक्स करतो गुळ, जाणून घ्या आरोग्यासाठी कशाप्रकारे लाभदायक
Eknath Khadse | खडसे-अमित शहा भेटीवर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण, ही भेट घेण्यापूर्वी…