नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रजासत्ताक दिनी देशाचे पंतप्रधान हे प्रथम शहीद जवानांचे स्मरण म्हणून इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती येथे जाऊन श्रद्धांजली अर्पण करतात. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही 48 वर्षांची परंपरा आज मोडली. पंतप्रधान मोदी हे अमर जवान ज्योती येथे न जाता नव्याने बांधलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक स्थळी गेले आणि तेथे त्यांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी देशाचे पहिले सीडीएस (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) आणि लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांनी त्यांचे स्वागत केले.
Delhi: PM Modi leads the nation in paying tributes to the fallen soldiers, by laying a wreath at National War Memorial. Chief of Defence Staff Gen Bipin Rawat, Army Chief Gen Naravane, Navy Chief Admiral Karambir Singh, Air Force Chief Air Marshal RKS Bhaduria present pic.twitter.com/DopNkALhVA
— ANI (@ANI) January 26, 2020
Delhi: PM Modi leads the nation in paying tributes to soldiers who lost their lives in the line of duty, by laying a wreath at National War Memorial. CDS Gen Bipin Rawat, Army Chief Gen Naravane, Navy Chief Admiral Karambir Singh, Air Force Chief Air Marshal RKS Bhaduria present. pic.twitter.com/CGTWo2Co4Y
— ANI (@ANI) January 26, 2020
1971 मधील भारत-पाक युद्धातील शहीदांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती इंडिया गेट येथे 1972 मध्ये तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी देशाचे पंतप्रधान प्रजासत्ताक दिनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करतात. मागील 48 वर्षांपर्यंत ही परंपरा अखंड सुरू होती. मात्र, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही परंपरा मोडीत काढत नव्याने बांधलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे जाऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. नव्याने बांधण्यात आलेले 44 एकरांवर पसरलेले युद्ध स्मारक हे चार स्तंभांनी बनलेले आहे. अमर चक्र, शौर्य चक्र, संन्यास चक्र आणि रक्षक चक्र, 25,942 जवानांची नावे ग्रॅनाइट टॅब्लेटवर सोन्याच्या अक्षरांनी लिहिलेली आहेत.
पंतप्रधानांनी मागील वर्षी 25 फेब्रुवारी रोजी हे युद्ध स्मारक देशाला समर्पित केले होते. याच ठिकाणी आज प्रजासत्ताक दिनी पंतप्रधानांनी शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यात प्रथमच देशाचे पहिले सीडीएस (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) सहभागी झाले होते. माजी लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी 1 जानेवारीला सीडीएसचा पदभार स्वीकारला होता. ते आजच्या प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्यात पहिले सीडीएस म्हणून उपस्थित होते.
Visit : bahujannama.com