मुंबई – बहुजननामा ऑनलाइन – Repeal Farm Laws | गेल्या एक वर्षांहून अधिक काळापासून चालत आलेल्या किसन मोर्चाला (Farmers Protest) आज न्याय (Justice) मिळाला आहे. हा मोर्चा केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात (Farmers Law) होता. अशातच 19 नोव्हेंबर 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींने (PM Narendra Modi) तिन्ही कृषी कायदे माघार घेतले आहेत. यानिमित्ताने आज अनेक दिग्गज कलाकारांनी (Celebrities Rection) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत तर अनेकांनी वेगवेगळ्या प्रक्रिया (Repeal Farm Laws) देखील दिले आहेत.
नरेंद्र मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करत असताना आपण भारतीयांची माफी मागत खऱ्या मनापासून त्यांना समजून घेऊ शकलो नाही, असं म्हटलं आहे. तर आज गुरुनानक जयंती निमित्त आम्ही तिन्ही कृषी कायदे माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, या महिनाअखेरला होणाऱ्या अधिवेशनेत तिने कृषी कायदे मागे (Repeal Farm Laws) घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येतील, असं देखील मोदींनी म्हटलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
घोषणेवेळी शेतकऱ्यांना आपल्या घरी व शेतात माघारी जाण्याची विनंती (Request) देखील मोदींनी केली आहे. या घोषणेनंतर अभिनेत्री तपसी पन्नूने मोदींच्या घोषणेचा स्क्रीनशाॅट शेअर करत ‘इसके साथ ही गुरुपरब ने दी वधाइयां’, असं म्हटलं आहे. तर हिमांशी खुरानाने अखेर आपला विजय झाला, सर्व शेतकऱ्यांना लोकांकडून खूप खूप शुभेच्छा, असं म्हटलं आहे. तसेच अभिनेत्री रिचा चड्डाने देखील पोस्ट शेअर केली आहे. भारताला आपल्या शेतकऱ्यांकडून शिकण्याची गरज आहे, असं म्हणत तिने शेतकऱ्यांना सलाम केला आहे. तसेच यांसोबत अनेक कलाकारांनी या घोषणेवर आपली प्रतिक्रीया (Celebrities Reaction) दिली आहे. (Repeal Farm Laws)
Web Title : Repeal Farm Laws | taapsee pannu kangana richa celebs reaction on pm modi announces repeal of 3 contentious farm laws.
Chandrakant Patil | ‘कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी मी मोदींना विनंती करणार’ – चंद्रकांत पाटील
Amruta Fadnavis | ‘आओ कुछ तूफानी करते है, कल शाम ….मी पुन्हा’… ! अमृता फडणवीस यांचं ट्विट