बहुजननामा ऑनलाइन टीम –वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर आणि या परिसरातील ज्ञानवापी मशिदी जवळ खोदकाम करताना प्राचीन मंदिरांचे अवशेष सापडले आहेत. या अवशेषांचा शोध घेण्यासाठी पुरातत्व विभागाची मदत घेतली जात आहे. द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर कुंभातील पुतलीबाई धर्मशाळेच्या जवळ व ज्ञानवापी मशिदीपासून काही अंतरावर पुरातत्व अवशेष सापडले आहेत.
हे अवशेष मंदिराचे आहेत आणि ते 16 व्या शतकातील आहेत. येथे विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर बांधण्यासाठी खोदकाम केले जात होते. पुतलीबाई धर्मशाळेजवळ हे अवशेष सापडले असून ज्ञानवापी मशिदीपासून त्याचे अंतर 10-15 मीटर आहे. या अवशेषांच्या चौकशीसाठी पुरातत्व विभागाची मदत घेतली जात आहे. परंतु कोणताही अधिकारी या संवेदनशील विषयावर काही बोलण्यास टाळाटाळ करीत आहे. अहवाला नुसार हे अवशेष सोळाव्या शतकातील मंदिराबद्दल सांगितले जात आहेत.
हे अवशेष सापडल्यानंतर संपूर्ण परिसराची पुरातात्विक सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे. हा अवशेष मिळाल्यावर अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी जितेंद्रानंद यांनी सांगितले की, संत समितीने नेहमीच भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली या जागेचे खोदकाम करण्याची मागणी न्यायालय व जनतेकडे केली आहे आणि येथून मिळालेल्या अवशेषाचा ज्ञानवापी मशिद आणि विश्वनाथ मंदिर यावर निर्णय घेतला पाहिजे.