मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- बुधवारी सकाळपासून मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याचा अंदाज आहे की, 5 जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. यात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई वेधशाळेने याबाबत माहिती दिली आहे. सकाळपासून वाहतूकही विस्कळीत झाली आहे. मध्ये रेल्वेदेखील ठप्प झाली आहे. चाकरमान्यांचे घरी पोचण्यासाठी हाल होऊ शकतात. मुंबईतील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
मुंबई आणि ठाण्यातील नागिरकांना गरज असेल तर घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे कारण मुंबई आणि ठाण्यात येत्या 24 तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे अतिवृष्टी होत आहे.
Maharashtra: Water logging in parts of Mumbai following heavy rainfall; visuals from King's circle. #MumbaiRains pic.twitter.com/M1MXLwDt6s
— ANI (@ANI) September 4, 2019
हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की, गुरुवारनंतर पावसाचा जोर कमी होईल. याशिवाय पुढील दोन ते तीन दिवस मान्सून राज्यभरात सक्रिय राहणार आहे. सोमावारी सुरु झालेल्या या मुसळधार पावसानं सायन, अॅन्टॉप हिल, हिंदमाता, टिळकनगर, मिलन सबवे, वांद्रे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं आहे.
Mumbai has witnessed 403 mm of rains in just four days time against its monthly average of 341 mm in September. #Mumbai #MumbaiRains #MumbaiRain #MumbaiRainsLive #MumbaiRainsLiveUpdates #mumbairainliveupdates https://t.co/y5mIKZcilY
— SkymetWeather (@SkymetWeather) September 4, 2019
सप्टेंबरचं रेकॉर्ड ब्रेक
या वर्षी मुंबईत सप्टेंबरच्या पहिल्या 4 दिवसांतच एवढा पाऊस झाला की, दरवर्षी सप्टेंबरमध्ये पडणाऱ्या पावसाचे रेकॉर्ड मोडले आहे. मुंबईत सप्टेंबरमध्ये सरासरी 341 मिमी इतका पाऊस असतो. चारच दिवसांत तब्बल 403 मिमी पाऊस पडला आहे. वेधशाळेने बुधवारी रेड अलर्ट जारी केला आहे. गुरुवारीही अनेक भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
गडचिरोलीतील गावांचा संपर्क तुटला
गडचिरोलीतील भामरागड तालुक्यासह 100 गावांचा संपर्क तुटला आहे. पर्लकोटा आणि बांडिया नदीला पूर आल्याने पूलही पाण्याखाली गेला आहे. कुमरगुडा नाल्याचाही पूल पाण्याखाली आहे. त्यामुळे अनेक गावांशी संपर्क होत नाही.