नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रॉडकास्ट इंजीनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) मध्ये नॉन फॅकल्टी ग्रुप बी व सीच्या शेकडो पदांवर भरती (Recruitment) काढण्यात आली आहे. यामध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांची भोपाळच्या एम्समध्ये (Aiims Bhopal) नियुक्ती करण्यात येणार आहे. ही भरती वेगवेगळ्या पदांवर करण्यात येणार असून या पदांसाठी 10 वी पास ते पदवीधर अर्ज करु शकतात.
तरुणांना सरकारी नोकरीची (Sarkari Naukri) मोठी संधी उपलब्ध झाली असून या पदभरतीची नोटीस बेसिलने वेबसाईटवर जारी केली आहे. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया ही 10 डिसेंबरपासून सुरु झाली आहे.
पदांची एकूण संख्या – 727
या पदांची होणार भरती ?
कॅशिअर (cashier), इलेक्ट्रीशियन (Electrician), स्टेनोग्राफर, अपर व लोवर डिव्हिजन क्लार्क, स्टअर कीपर, एडमिन ऑफिसर, असिस्टेंट इंजीनियर, पब्लिक हेल्थ नर्स, लायब्रेरियन, मॅनेजर, डाएटीशियनसह अनेक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
शिक्षण व वयाची अट
कोण्त्या पदासाठी शिक्षण, वयाची अट आदी माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
अर्ज कसा कराल ?
या पदभरतीसाठी बेसिलच्या becil.com विका becilaiimsbhopal.cbtexam.in वर जावे लागेल. किवां खालील लिंकवर क्लिक करुन अर्ज भरु शकता.
अर्ज करण्याची अंतिम मुदत
विविध पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2020 आहे. म्हणजेच अर्ज करण्यासाठी केवळ एकच आठवडा शिल्लक राहिला आहे.
मदत कुठे मिळेल ?
या भरतीसंबंधी महिती हवी असल्यास तुम्ही दिलेल्या इमेल आयडीवर संपर्क करु शकता. तांत्रिक अडचणींसाठी khuswindersingh@becil.com या ईमेल आयडीवर संपर्क करु शकता. अन्य अडचणींसाठी maheshchand@becil.com या इमेल आयडीवर संपर्क करु शकता.
उमेदवारांची निवड परीक्षा आणि मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.