RBI To Withdraw Rs 2000 Currency Note From Circulation | आरबीआयचा मोठा निर्णय ! 2000 च्या नोटा चलनातून बंद होणार, पण 30 सप्टेंबरपर्यंत राहणार वैध; जाणून घ्या नोटा कधी बदलता येणार अन् एका वेळी किती नोटा बदलता येणार?

RBI To Withdraw Rs 2000 Currency Note From Circulation | Big decision of RBI! 2000 notes to be phased out, but valid till September 30; Know when the notes can be changed and how many notes can be changed at a time?

नवी दिल्ली : RBI to withdraw Rs 2000 currency note from circulation | आरबीआयने 2000 च्या नोटा वापस घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सध्या बाजारात असलेल्या नोटा वैध राहणार आहेत. आरबीआयकडून आता यापुढे 2000 च्या नोटा छापल्या जाणार नाहीत. अलिकडील काळामध्ये एटीएममधून केवळ 500 च्या नोटा येत होत्या. त्याच वेळेस ही शंका काही जणांकडून व्यक्त करण्यात येत होती. आज मात्र आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.

मार्च 2017 मध्ये 2000 च्या नोटा बाजारात आणण्यात आल्या होत्या. आता यापुढे मात्र 2000 च्या नोटांची छपाई केली जाणार नाही. लोकांना काही एक घाबरण्याचे कारण नाही कारण आता सध्या बाजारात असलेल्या 2000 च्या नोटा वैध आहेत. क्लीन नोट पॉलिसीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 च्या नोटा नागरिक बँकामध्ये जमा करू शकणार आहेत असं देखील सांगण्यात आलं आहे.(RBI To Withdraw Rs 2000 Currency Note From Circulation)

 

नोटा कधीपासून बदलता येणार?

बँकांमध्ये 23 मे पासून ही 2000 रुपयांची नोट बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.

 

एका वेळी किती नोट बदलता येणार?

एकावेळी फक्त 2 हजार रुपयांच्या नोटा 20 हजार रुपयांपर्यंत बदलू शकता.
यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update