नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आर्थिक धोरण समितीची बैठक आज पार पडली. यादरम्यान आरबीआयने आता पॉलिसी इंटरेस्ट दरात कोणताही बदल केला नाही. तसेच रेपो रेटही 4 टक्क्यांवर कायम ठेवला आहे.
आरबीआयने आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या सहामाहीसाठी किरकोळ महागाई दर अंदाजात बदल केले असून, 5-5.2 टक्के केले आहे. आरबीआयने पॉलिसी इंटरेस्ट दरात कोणताही बदल केला नाही. मात्र, हा दर 4.6-5.2 टक्क्यांवर होता. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले, की समितीने व्याज दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अर्थव्यवस्थेच्या रिकव्हरीचे संकेत आणखी मजबूत झाले आहेत. महामारीच्या संकटाचा सामना करणारे सर्वाधिक सेक्टर आता सामान्य स्तरावर झपाट्याने वाढत आहे. अशा सेक्टरची संख्याही वाढली आहे.
आर्थिक विकासाला पाठिंबा देण्याची गरज
आरबीआयने आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या सहामाहीत किरकोळ महागाई दरानुसार, त्यामध्ये बदल (Revise) केले असून, 5-5.5 टक्के केले आहे. यापूर्वी हा अंदाज 4.6-5.2 टक्के केला होता. याबाबत शक्तिकांत दास यांनी सांगितले, की महागाई दर 6 टक्क्यांपेक्षा टॉलरेंस स्तराखाली गेला आहे.
2022 मध्ये आर्थिक विकास 10.5 टक्के अंदाज
आर्थिक वर्ष 2022 साठी आर्थिक विकास अंदाज दर 10.5 टक्के लावण्यात आला आहे. तसेच चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी किरकोळ महागाई दराचा अंदाज 5.8 टक्क्यांपासून रिवाईज (बदल) करून आता 5.2 टक्के झाला आहे.
4.59 टक्क्यांवर आला महागाई दर
डिसेंबर 2020 च्या सरकारी आकड्यानुसार, किरकोळ महागाई दरात कपात होऊन 4.59 टक्के झाला आहे. तसेच नोव्हेंबर 2020 मध्ये किरकोळ महागाई दर 6.93 टक्के होता. पण यामध्ये कमी दिसत आहे.