नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गॉगल म्हटलं की तुम्हाला धूळ, उन्हापासून संरक्षण करणारे अन् तुम्हाला जरा हटके लुक देणारी काच समोर येऊ शकते. या गॉगलचा वापर फक्त पाहण्यासाठीच केला जात असायचा. मात्र, आता तुम्हाला याच गॉगलच्या मदतीने कॉल करता येणार आहे. इतकेच नाहीतर तुम्हाला गाणीही ऐकता येणार आहे. होय, आता हे शक्य झालंय.
‘रेजर’ या अमेरिकेतील कंपनीने नव्या स्मार्ट ग्लासची (गॉगल) निर्मिती केली आहे. ‘अंझू स्मार्ट ग्लास’ (Razer Anzu Smart Glasses) असे या गॉगलचे नाव आहे. हा गॉगल वर्तुळाकार आणि आयताकृती या दोन आकारांमध्ये लाँच करण्यात आला आहे. मात्र, हा गॉगल फक्त काळ्या रंगातच उपलब्ध आहे. या गॉगलमध्ये बिल्ट-इन स्पीकर, टक कन्सोल आणि ब्ल्यू लाइट फिल्टरचे फीचर्स देण्यात आले आहेत.
याशिवाय हा गॉगल ब्ल्यूटूथनेही कनेक्ट करता येणार आहे. त्यामुळे कॉल घेता येणार आहे. सध्या हा गॉगल फक्त अमेरिकेतच उपलब्ध आहे.
असे आहेत या गॉगलचे फीचर्स –
– मध्यम आणि छोट्या आकारात उपलब्ध
– बिल्ट-इन स्पीकरशिवाय 16 MM चे ड्रायव्हर
– या गॉगलमध्ये बिल्ट-इन रिचार्जेबल बॅटरी
– सिंगल चार्जमध्ये ही बॅटरी पाच तास चालेल
– गॉगल फोल्ड केल्यास तो आपोआप बंद
– किंमत – 14,600 रुपये