पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Corporator Ravi Landage – Corporator Sanjay Newale | पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला (PCMC BJP) धक्क्यावर धक्के बसत आहे. यापूर्वी चार नगरसेवकांनी (Corporator) राजीनामा (Resignation) दिला असून आज रवि लांडगे (Ravi Landage) आणि संजय नेवाळे (Sanjay Newale) यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. लांगडे आणि नेवाळे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील (PCMC Municipal Commissioner Rajesh Patil) यांच्याकडे भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे.
पिंपरी चिंचवड भाजप नगरसेवक वसंत बोराटे (Corporator Vasant Borate), तुषार कामठे (Corporator Tushar Kamthe), माया बारणे (Corporator Maya Barne) आणि चंदा लोखंडे (Corporator Chanda Lokhande) यांनी यापूर्वीच नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज दोघांनी राजीनामा दिल्याने राजीनामा देणाऱ्या नगरसेवकांची संख्या सहा झाली आहे. भाजपला रामराम ठोकणारे बहुतांश नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करत आहेत. लांडगे आणि नेवाळे हे देखील राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे.
रवि लांडगे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप आमदार महेश लांडगे (BJP MLA Mahesh Landage) यांच्यावर निशाणा साधला. महेश लांडगे यांच्या हुकुमशाही, भ्रष्ट कारभाराला कंटाळून राजीनामा देत असल्याचे लांडगे यांनी सांगितले.
Web Title :- ravi landage and sanjay newale resign as pcmc corporators Pimpri Chinchwad Corporation
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Gold-Silver Rate Today | …म्हणून सोने-चांदीचे भाव वधारले, जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट