लातूर : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. त्यांच्यावर नांदेड येथे उपचार चालू होते. गेल्या काही दिवंसापुर्वी महाराज संजीवन समाधी घेणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. त्या चर्चेमुळं अहमदपूर भक्तिस्थळ भागात हजारोंनी गर्दी केली होती. मात्र, ती अफवा असल्याचं समोर आले होते.
नांदेड येथे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्यावर उपचार चालू होते. आताच मिळालेल्या माहितीनुसार महाराजांचं वयाच्या 103 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळं त्यांच्या भक्तांवर शोककळा पसरली आहे.