बहुजननामा ऑनलाईन टीम – Rashi Khanna | अभिनेत्री राशी खन्ना नेहमीच तिच्या लुक मुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेते असते. राशीने दाक्षिणात्य चित्रपटासोबतच बॉलीवूड मध्ये देखील तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या राशीने शेअर केलेला नव्या फोटोमध्ये तिचा ग्लॅमर लुक पाहायला मिळत आहे. यामध्ये ती खूपच क्लासि आणि स्टायलिश दिसत आहे. (Rashi Khanna)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राशीचा जन्म दिल्लीत 30 नोव्हेंबर 1990 रोजी झाला तेथेच तिने तिचे शिक्षण ही पूर्ण केले. राशी अभ्यासामध्ये देखील फार हुशार होती. लहानपणी राशीला आयएएस ऑफिसर होण्याचे स्वप्न होते. मात्र मॉडलिंग आणि अभिनय क्षेत्रात वळून तिने तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. राशी खन्नाचा निरागस अंदाज आणि अभिनयाने चाहते नेहमीच तिचे कौतुक करत असतात. (Rashi Khanna)
राशीने तिच्या अभिनयाची सुरुवात ‘मद्रास कॅफे’ या बॉलीवूड चित्रपटातून 2013 साली केली होती. त्यानंतर तिने 2014 साली ‘ओहलु गुसागुलादेड’ या तेलुगु चित्रपटातून तेलुगु चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. राशीने तिच्या अभिनयाने तेलुगु आणि हिंदी क्षेत्रात गाजवले आहे. राशी तेलगू चित्रपटसृष्टीत सर्वाधिक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. राशीने आजवर ‘बंगाल टायगर’, ‘सुप्रीम’ आणि ‘जय लवा कुसा’ या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Rashi Khanna | raashii khanna latest photos biography filmography
हे देखील वाचा :