बहुजननामा ऑनलाईन टीम – फेमस अमेरिकन सिंगर आणि संगीतकार किंग वॉन (King Von) याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. किंग 26 वर्षांचा होता. अटलांटामधील एक नाईट क्लब बाहेर झालेल्या 2 गटांमधील गोळीबारात काही गोळ्या या किंग वॉनलाही लागल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
सध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचं वातावरण आहे. देशात सगळीकडे निवडणुकीवरच चर्चा होताना दिसत आहे. अटलांटामधील एका नाईट क्लबमध्ये शुक्रवारी रात्री असेच काहीसे मतभेद झाले. याच रुपांतर पुढे वादात आणि नंतर भांडणात झालं. दोन्ही गटांनी एकमेकांवर गोळीबार केला. यातल्या काही गोळ्या या तिथं उपस्थित असलेल्या किंग वॉनला लागल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
अमेरिकेतल्या काही वृत्तवाहिन्यांनी किंग वॉन याच्या मृत्यूसाठी पोलीस प्रशासनाला जबाबदार धरलं आहे. हा वाद सुरू होता तेव्हा तिथं काही पोलीसही उपस्थित होते, तरीही त्यांनी हे भांडण थांबवलं नाही. परिणामी या संगीतकाराचा मृत्यू झाला असा आरोप केला जाताना दिसत आहे. हे आरोप पोलिसांनी मात्र फेटाळले आहेत. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या 5 पोलिसांना अटक केली आहे.