मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८ मध्ये दीप-वीरने लग्नगाठ बांधली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी रणवीर-दीपिकाने इटलीत डेस्टिनेशन वेडिंग केलं. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाचा आज दुसरा वाढदिवस आहे.
लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी दीपिका व रणवीरने सोशल मीडियावर एकमेकांसोबतचा फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
‘मेरी गुडिया’ म्हणत रणवीरने पत्नीसाठीचं त्याचं प्रेम व्यक्त केलंय संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.