बहुजननामा ऑनलाईन : रेल्वे प्लॅटफॉर्मवरून ते बॉलीवूड गायक असा प्रवास करणाऱ्या रानू मंडल यांचे नुकताच पहिले बॉलिवूड गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे रिलीज होताच रानू पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. एका व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर खळबळ उडवणार्या रानू मंडलविषयी अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. ज्यामध्ये काही खऱ्या तर काही खोट्या होत्या. त्यात सर्वात जास्त रंगलेली चर्चा म्हणजे, राणूच्या आवाजावर खूष झाल्यानंतर सलमान खानने तिला ५५ लाखांचा फ्लॅट आणि कार गिफ्ट केली आहे. त्याच वेळी, ही गोष्ट देखील पूर्णपणे खोटी सांगितली गेली. अशा बातम्यांवरून आता स्वत: रानू मंडलने या विधानावर आपले मौन तोडले आहे.
रानू मंडलला एका मुलाखतीत सलमान खानने ५५ लाखांचा फ्लॅट भेट दिल्याची बातमी संदर्भात जेव्हा विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी रानू म्हणाल्या कि, ‘जर सलमानने मला घर दिले असते, तर त्याने सर्वांसमोर घोषणा केली असती. जर तो स्वत: येऊन असे काही बोलला नाही तर असा विचार करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे ‘लोक जसे वाटते तसे लिहित राहतात’. त्याचवेळी या मुलाखतीत राणूला विचारण्यात आले होते की, त्यांनी चित्रपटात गाण्यासाठी सलमानची काही मदत घेतली आहे का ? यावर रानूने उत्तर दिले की नाही मी कोणाशीही बोलले नाही. त्याच्याशी बोलणे ही दूरची गोष्ट आहे, मी हिमेश रेशमियालासुद्धा बोलले नाही. त्यांनी मला सुपरस्टार सिंगरमध्ये गाताना ऐकले होते. हिमेश मला देवाच्या रूपात भेटले, त्यांची मी खूप आभारी आहे. ‘
रानू म्हणाल्या की, ‘तपनने मला सांगितले की, फ्लॅटशिवाय सलमानने मला लाल रंगाची कार दिली आहे, अशी चर्चादेखील सुरू आहेत. परंतु मी अशा गोष्टींवर कधीही विश्वास ठेवला नाही कारण जर मी त्यांच्याशी कधी बोलले असते किंवा त्यांनी कोणतीही घोषणा केली असती तर ही गोष्ट योग्य ठरली असती. रानू मंडलने हिमेश रेशमिया यांच्या ‘हॅपी हार्डी और हीर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पार्श्वगायक म्हणून पदार्पण केले आहे. या चित्रपटासाठी त्यांनी हिमेशबरोबर एक नव्हे तर तीन गाणी रेकॉर्ड केली आहेत. हिमेश रानूवर इतका प्रभावित झाला आहे की त्याने म्हटले आहे की, रानूला सूपरस्टार होण्यापासून कोणी रोखू शकत नाही.