बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रीय जनता दलाचे नेता लालू प्रसाद यादव यांना त्यांच्या मूत्रपिंडाच्या खराब प्रकृतीमुळे झारखंडची राजधानी रांचीतील रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किडनीच्या आजाराने पिडीत लालू यांना त्यांच्या दोन सेवकांना मुत्रपिंड दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यादव यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे दोन कार्यकर्ते सुरेंद्र यादव आणि इरफान अन्सारी यांनी त्यांना किडनी दान करण्याची घोषणा केली. सुरेंद्र यादव यांनी रिम्सचे संचालक, अधीक्षक, आणि तुरुंग अधीक्षक यांना गरज लागल्यास यादव यांना किडनी द्यायला तयार आहोत, असा लिखित स्वरुपात अर्ज दिला. तर अन्सारी यांनी देखील किडनी देण्याची तयारी दर्शविली. तसेच गरज भासल्यास त्यांच्या घरचे देखील त्यांना किडनी द्यायला तयार आहेत. त्यामुळे ज्याची किडनी मॅच करेल त्याच्या किडनीचे प्रत्यारोपण कऱण्यात येईल.
चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरलेल्या लालू यादवला बरीच महिने रिम्समध्ये दाखल केले आहे. ते १५ हून अधिक आजारांनी ग्रस्त आहेत. अलीकडेच त्याचे मूत्रपिंड केवळ ३७ टक्के काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. लालू प्रसाद यादव यांचे डॉक्टर डॉ. डी. के झा यांच्या मते लालू यादव यांना अद्याप डायलिसिसचीही गरज नसल्याची माहिती दिली.