बहुजननामा ऑनलाइन टीम – रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडपे आहेत. या दोघांच्या जोडीला प्रेक्षक खूप पसंत करतात. रणबीर आलियाने आपलं प्रेम प्रकरण उघड केल्यापासून त्यांच्या लग्नाची चर्चा सतत सुरु असते. आता या जोडप्याच्या लग्नासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे. यापूर्वी अशा बातम्या आल्या होत्या की, यावर्षी डिसेंबरमध्ये रणबीर-आलिया लग्न करणार आहेत. पण आता असं होणार नाही. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रणबीर आणि आलियाने यावर्षी नव्हे तर पुढच्या वर्षी लग्न करण्याचे ठरवले आहे. हा निर्णय फक्त कोरोनामुळे घेतलेला नसून दोघांनीही त्यांच्या प्रोफेशनल असाइनमेंट्समुळे असा विचार केला आहे.
येत्या काही महिन्यांमध्ये रणबीर-आलिया त्यांच्या प्रोजेक्ट्समुळे व्यस्त राहू शकतात. म्हणूनच त्यांनी लग्नाची तारीख पुढे घेतली आहे. आता या जोडप्याचे 2021 मध्ये लग्न होणार आहे. आलियाने लग्नाच्या लेहेंगासाठी डिझायनर सब्यसाचीकडे संपर्क साधल्याची बातमी आहे. पण आता लग्नाची तारीख पुढे गेल्यामुळे आउटफिटची प्लॅनिंग देखील रखडली आहे. या दोघांनाही लग्नाच्या जोड्यामध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आलिया-रणबीरचे नाते दोन्ही कुटुंबियांना मान्य आहे. आलिया कठीण काळात रणबीरच्या कुटूंबाबरोबर ठामपणे उभी राहिली.
अभिनेता ऋषी कपूर यांच्या निधनानंतर आलियाने रणबीर कपूर आणि त्याच्या कुटुंबाला प्रत्येक वळणावर पाठिंबा दिला. आलिया कपूर फॅमिलीच्या अगदी जवळ आहे आणि सगळ्यांसोबत तिचे बॉन्डिंग छान आहे. आलिया बर्याचदा गेट-टुगेदर आणि रणबीरच्या कुटूंबियांसह हँगआउटवर दिसली आहे. रणबीर आणि आलियाची जोडी चाहत्यांमध्ये बरीच लोकप्रिय आहे. अशा परिस्थितीत दोघांचे लग्न हे कोणत्याही मोठ्या इव्हेंटपेक्षा कमी नाही. ‘ब्रह्मास्त्र’ या फॅन फिल्ममध्ये पहिल्यांदाच रणबीर आलियाची जोडी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनामुळे, त्याची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.