बहुजननामा ऑनलाइन – गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी असलेले केंद्रीय मंत्री(ramvilas paswan) रामविलास पासवान यांची रात्री उशिरा हार्ट सर्जरी केली गेली.(ramvilas paswan) रामविलास पासवान यांचे पुत्र आणि जमुईचे खासदार चिराग पासवान यांनी ही माहिती ट्विटद्वारे दिली आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एका रुग्णालयात हार्ट सर्जरी करण्यात आली. एलजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्विट करत सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून वडिलांवर रूग्णालयात उपचार सुरू होते. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे रात्री उशिरा त्यांच्या हृदयाचे ऑपरेशन करावे लागले.
चिराग पासवान म्हणाले की गरज पडल्यास त्यांच्या वडिलांचे काही आठवड्यांनंतर आणखी एक ऑपरेशन करावे लागेल. चिराग म्हणाले की, या संकटाच्या परिस्थितीत माझ्या आणि माझ्या कुटुंबासमवेत उभे राहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार.
पिछले कई दिनो से पापा का अस्पताल में इलाज चल रहा है।कल शाम अचानक उत्पन हुई परिस्थितियों की वजह से देर रात उनके दिल का ऑपरेशन करना पड़ा।ज़रूरत पड़ने पर सम्भवतः कुछ हफ़्तों बाद एक और ऑपरेशन करना पड़े।संकट की इस घड़ी में मेरे और मेरे परिवार के साथ खड़े होने के लिए आप सभी का धन्यवाद।
— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) October 3, 2020
दरम्यान काही दिवसांनंतर बिहारमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. रामविलास पासवान यांची तब्येत खालावल्यामुळे पक्षासमोरील अडचणी वाढल्या आहेत. कारण रामविलास पासवान हे जनशक्ती पार्टीचे प्रमुख नेते आहेत. सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.