बहुजननामा ऑनलाईन – सध्या अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) खूपच चर्चेत आहे. राखीने बॉयफ्रेंड आदिल खान दुरानी सोबत सात महिन्या आधीच लग्न केल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वीच केला होता. तर आता पुन्हा एकदा राखी आणि आदिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा राखीला (Rakhi Sawant) ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ खूपच जुना आहे. एका ब्रँडच्या फोटोशूट दरम्यान आदिल आणि राखी यांचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की राखी आणि आदिल ने लीप लॉक केले आहे. यावेळी राखीने गुलाबी रंगाचा ऑफ शोल्डर हाय स्वीट गाऊन परिधान केला आहे. यावर तिने सिल्वर कलरचे हिल्स परिधान करत हेवी मेकअप आणि करली हेअर करत तिने आपला लूक पूर्ण केला आहे. तर आदिल खान दुरानीने ब्राऊन कलरचा सिमरी वर्क असलेला सूट परिधान केला आहे. ज्यावेळी हे लीप लॉक करत होते त्यावेळी आदिल हा थोडासा हसत लाजताना दिसत होता. मात्र राखी खूपच बिंदास दिसत होती. त्यांच्या या व्हिडिओवरून सध्या नेटकऱ्यांनी राखीला अनेक कमेंट करत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
राखी सावंतचे (Rakhi Sawant) आदिल खान दुरानी सोबत हे दुसरे लग्न आहे.
याआधी तिने रितेश सोबत लग्न केले होते. दोघेही बिग बॉसच्या घरात पाहिले गेले.
बिग बॉसच्या घरात दोघांमध्ये अनेक वाद निर्माण झाले होते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताचा दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राखीने आदिल खानला डेट करण्यास सुरुवात केली. अद्याप तरी आदिलच्या परिवारांनी राखीला स्वीकारले नसल्यामुळे त्यांनी हे लग्न लपवल्याचे सांगितले जात आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Rakhi Sawant | rakhi sawant adil durrani liplock video viral fans says mashallah new couple
हे देखील वाचा :
Ajit Pawar | नाशिक पदवीधर मतदासंघातील उमेदवारीबाबत अजित पवार यांनी केले मोठे भाष्य; म्हणाले…
Sanjay Raut | महाविकास आघाडीतील समन्वयाबद्दल खासदार संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…