बहुजननामा ऑनलाईन – Rakhi Sawant | सध्या बिग बॉस मराठी एक चांगल्याच वळणावर येऊन थांबले आहे. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एकत्रित चार वाइल्ड कार्ड एन्ट्री झाल्याने घरातील सदस्यही चकित झाले होते. राखी सावंत, विशाल निकम, आरोह वेलणकर व मीरा जग्गनाथ या सदस्यांनी घरात दमदार एन्ट्री घेतली होती. तर राखीला घरात पाहिल्यानंतर सदस्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते. राखीने घरात प्रवेश करताच वादाला सुरुवात झाली होती. (Rakhi Sawant)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
एंटरटेनमेंट क्वीन म्हणून ओळख असणारी अभिनेत्री राखी सावंत सध्या बिग बॉस मराठी मध्ये एन्ट्री घेताच धुमाकूळ गाजवत आहे. या ना त्या कारणाने ती प्रत्येकासोबत वाद करताना दिसत आहे. तर आता राखीने घरामध्ये एक नवीनच ड्रामा सुरू केला आहे. याआधी तिने तेजस्विनी लोणारशी वाद घालायला सुरुवात केली होती. रहिवासी संघ बोर्डावर पहिल्या नंबरला कोणाच्या नावाची पाटी लागणार यावरून तिचे आणि तेजस्विनीचे वाद रंगले होते. (Rakhi Sawant)
तर आता राखीने चक्क मध्यरात्री बिग बॉस कडे कॉफी मागितली आहे.
कलर्स मराठी वाहिनीने एक नवा प्रोमो त्यांच्या इंस्टाग्राम वर शेअर केला आहे.
यामध्ये दिसत आहे की सर्व सदस्य झोपले असताना राखी मोठमोठ्याने बोलताना दिसत आहे.
हे ऐकून विशाल निकम तिला म्हणतो “तुमच्या बोलण्यामुळे सर्वांना त्रास होत आहे शांत बसा”.
यावर राखी चिडते आणि त्यालाच म्हणते “तू झोप मला नको सांगूस” या तिच्या उद्धटपणाच्या वागण्याने
विशाल म्हणतो “अरेरावी नाही चालणार येथे” तर विशालच्या या बोलण्याने माझी मर्जी असे म्हणत राखी
मी कोणाला झोपू देणार नाही असे देखील बोलते. तिच्या या बोलण्याने शेवटी विशाल वैतागून “अजून
मोठ्याने ओरड” असे म्हणतो. सध्या राखीचे हे वागणे पाहून प्रेक्षकही संतापले आहेत.
तर बिग बॉस मराठीच्या घरांमध्ये तुझी मर्जी चालणार नाही विकास तूच राखीला घराबाहेर काढ असे म्हणत प्रेक्षक आपले मत मांडत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :-Rakhi Sawant | bigg boss marathi season 4 rakhi sawant new drama fight with vishal nikam video goes viral on social media
हे देखील वाचा :
Covid-19 Death | कोरोना लसीमुळे झालेल्या मृत्यूला केंद्र सरकार जबाबदार नाही