मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Rajya Sabha Elections Results | राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Elections Results) सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उभे होते. त्यामध्ये भाजपचे (BJP) तिन्ही उमेदवार निवडून आले आहेत. तसेच शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत अतितटीची लढत होती. त्यामध्ये भाजपचे धनंजय महाडिक (Dhanjanya Mahadik) विजयी झालेत. तर, शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांना पराभव स्विकारावा लागला. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, “भाजपच्या कामगिरीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. आम्ही आमचा पराभव मान्य करतो. काय बरोबर आणि काय चुकले याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. जर तुम्ही संख्यांवर नजर टाकली तर स्पष्टपणे आमच्याकडे शेवटपर्यंत योग्य संख्या नव्हती. पण आम्ही एक संधी घेतली,”; अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. (Rajya Sabha Elections Results)
#WATCH I congratulate BJP on their performance. We accept our defeat. We clearly need to introspect on what went right & what went wrong. If you look at the numbers, clearly we didn't have right numbers till the end. But we took a chance…: NCP's Supriya Sule on RS poll result pic.twitter.com/Jf91auL204
— ANI (@ANI) June 11, 2022
शरद पवारांकडून फडणवीसांचं कौतुक
“अपक्षांना आपल्या बाजूने वळविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला आहे. अपक्ष आमदार आपलेसे करण्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना यश आलं. त्यांची रणनिती त्यांना विजयापर्यंत घेऊन गेली”, अशा शब्दात शरद पवारांनी (NCP Chief Sharad Pawar) देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.
Web Title :- Rajya Sabha Elections Results | congratulate BJP on their performance We accept our defeat NCP MP Supriya Sule
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
Late Period Reasons | तुम्हाला Periods उशीरा येत आहे का? जाणून घ्या याची 5 मोठी कारणे
Blood Sugar | ‘या’ फळभाजीची पाने डायबिटीज जलद करते कंट्रोल, जाणून घ्या कसे करावे सेवन